11वी प्रवेश प्रक्रिया : सुधारितवेळापत्रक, प्रवेशाचे टप्पे आणि महत्त्वाची माहिती:

    157

    सुधारित वेळापत्रक

    अर्ज भरणे :- 26 मे ते 3 जूनतात्पुरती गुणवत्ता यादी: 5 जूनहरकती, सुधारणा व आक्षेपः ६ ते ७ जूनअंतिम गुणवत्ता यादी: ८ जूनशून्य फेरी (व्यवस्थापन, अल्पसंख्यांक व इन-हाउस कोटा): ९ जूनपहिली यादी जाहीरः १० जूनप्रत्यक्ष कॉलेजात जाऊन प्रवेशः११ ते १८ जून

    11वी प्रवेश प्रक्रियेचे टप्पेःऑनलाईन नोंदणी (Part 1): विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाऊन त्यांची वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी भरून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यावर त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

    कागदपत्रे अपलोडः आवश्यक कागदपत्रे (उदा. १०वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रीमी लेयर, EWS, अपंगत्वाचे प्रमाणपत्र – लागू असल्यास)

    कॉलेज पसंतीक्रम निवडणे (Part 2): विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार किमान एक ते कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे (junior colleges) प्राधान्यक्रम निवडता येतील.

    अर्ज शुल्क भरणेः क्रेडिट/डेबिट कार्डकिंवा इतर ऑनलाइन पेमेंट पर्यायांद्वारे शुल्क भरावे लागेल (सामान्यतः ₹१००/-).

    अर्ज सबमिट करणे: अर्ज पूर्ण भरल्यावरतो सबमिट करावा आणि त्याची एक प्रत भविष्यातील संदर्भासाठी जतन करावी.

    महत्त्वाचे मुद्दे:

    यावर्षी सर्व प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत, ऑफलाइन प्रवेश घेता येणार नाहीत.ग्रामीण भागातील नेटवर्क आणि तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी शिक्षकांनी या पद्धतीला विरोध दर्शवला आहे, परंतु शासनाने ऑनलाइन प्रणालीच लागू केली आहे.तुम्ही तुमच्या गुणांनुसार आणि गतवर्षीच्या कट-ऑफनुसार महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडणे महत्त्वाचे आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here