
खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या मुलाचे मार्कशीट फेसबुक वर शेअर केलेले आहे. खासदार निलेश लंके यांचा मुलगा चिरंजीव तेजस लंके याला ८४.४० इतके टक्के मिळालेले असून निलेश लंके यांनी मुलाचे अभिनंदन केलेले आहे. फेसबुक पोस्टमध्ये निलेश लंके यांनी म्हटले आहे की माझा चिरंजीव तेजस लंके याने दहावीच्या परीक्षेत ८४.४०% गुण मिळवत आमच्या कुटुंबाला आनंदाचा क्षण दिला आहे. एक वडील म्हणून ही माझ्यासाठी फक्त टक्केवारी नाही तर त्याच्या परिश्रमाची शिस्तीची आणि स्वप्नांची पहिली पायरी आहे. राजकारणात असलो तरी माझं एकच स्वप्न माझं मूल प्रामाणिकपणे शिकावं प्रगती करावी, आणि या देशाचं उज्वल भविष्य घडवावं. तेजससह आज लाखो विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. कारण मुलांनी मेहनतीचं फळ मिळवलं. आणि ज्यांना यंदा काही कारणाने कमी मार्क्स आले हरकत नाही! यशाला वेळ लागतो पण जे जिद्दीने लढतात त्यांचं यश अधिक गाजतं. शिक्षण ही केवळ परीक्षा पास होण्याची गोष्ट नाही ती व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मनःपूर्वक शुभेच्छा !




