
या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगाव येथील जैन गल्ली मधील वाधवा कलेक्शन, प्रवीण कलेक्शन, बाबुजी कलेक्शन या कापड बाजारातील मोठ्या दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करुन घ्यावी व निम्म्या शेवगावची विशेषतः नाईकवाडी मोहल्ला धनगरगल्ली मारवाड गल्ली खालची वेस ढाकणे वस्ती परिसरामध्ये असणाऱ्या सर्व नागरीकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यात या मोठ्या व्यापाऱ्यांची भाषा कायम मग्रुरीची असते. शेवगांव

शहरात नगरपालिका स्थापन होऊन 10 वर्षे झाली परंतु अजुन गावठाण हद्दीतील व मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण कोणत्या राजकीय पुढाऱ्याला व एका व्यापाऱ्याला फायदा होण्यासाठी काढलं नाही त्यात जैन गल्ली येथील नवीन कापड दुकानदारांनी स्वतःची पार्किंग नाही बांधकाम कागदावर एक आणि प्रत्यक्षात पार्कंग ला एक फुट सुद्धा जागा ना सोडता वास्तविक सर्व खासगी दुकानदारांनी स्वतःच्या जागेत सुमारे साडेतीन मीटर म्हणजे 12 फुट पार्किंग सोडणे गरजेचे आहे तसे झालेले दिसत नाही याकरीता दिनांक २८ एप्रिल २०२५ सोमवार पासुन आमरण उपोषण तहसिल कार्यालयासमोर सुरु असुन याची कुठलीही गंभीर दखल नगरपरिषद प्रशासन तहसील कार्यलयनगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांत प्रसाद मते यांनी घेतलेली दिसत नाही

नाईकवाडी मोहल्ला परिसरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तरी येथील दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेत उपलब्ध करून न दिल्यास दिनांक २८ एप्रिल २०२५ पासून वधवा कलेक्शन समोर अमरण उपोषणाला बसणार आहे ही नम्र विनंती. १. मा. जिल्हा अधिकारी साहेब अहिल्यानगर २. मा. तहसीलदार साहेब शेवगाव३. मा. पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव ४. मा.नगररचना अधिकारी साहेब अहिल्यानगर बारनिशी लिपीक तहसिल कार्यालय, पार्किंग संदर्भात आमरण मागे घेण्यासाठी आपले या कार्यालयास प्राप्त पत्र दि. २२/०४/२०२५ उपरोक्त संदभीय पत्रान्वये आपण पत्रात नमूद केले की मी वरील ठिकाणी कायम रहिवासी असून जैन गल्ली मधील बधवा कलेक्शन, प्रवीण कलेक्शन, बाबूजी कलेक्शन या दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून द्यावी.

नाईकवाडी मोहल्ला परिसरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना ये-जा करतांना मोठ्या प्रमाणात विनाकारण बास सहन करावा लागत आहे.ताजा कलमवधवा कलेक्शन, प्रवीण कलेक्शन, बाबूजी कलेक्शन या दुकानदारा संबंधी परवानगी धारकाचे नावे व सिटी सर्वे नं अथवा गट नं नमूद नसल्याने या कार्यालयीन अभिलेखात उक्त बांधकामाबाबतच्या कागद पत्राचा शोध घेतल्यास संबंधित बांधकामाबाबतचे नावे व सिटी. सर्वे. नंबर. मध्ये सबंधीतानी घेतलेली बांधकाम परवानगी, नकाशा यांचेमध्ये तफावत आढळुन येत आहे.
प्रत्यक्ष जागेवरील बांधकामाची स्थिती पाहुन उक्त बांधकाम हे अतिक्रमणात असल्याचे ढळढळीत लक्षात येत असुन नगरपरिषदेच्या तत्कालीन कोणत्या अधिकाऱ्याने देऊन घेऊन परवानग्या दिल्या यांची सखोल चौकशी झाल्याशिवाय व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याशिवाय माघार नाही असे उपोषणकर्ते श्री शेख यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले[ क्रमशः]”घोड मेल वझ्यानी आणि शिंगरू मेल हेलपाट्यानी” यात हे उपोषण मिटावे म्हणुन एक गावपढारयाचीच जास्त मरमर चाल आहे



