माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन..!

    359

    ॐ शांति

    कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, आदरणीय अरुणकाका बलभीमराव जगताप यांचे दुःखद निधन झाले आहे.

    अंतिम पार्थिव दर्शन-आज – शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी, दुपारी २ वा. (भवानीनगर – निवासस्थानी, अहिल्यानगर)

    अंत्यविधी -आज – शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी, दुपारी ४ वा.(अमरधाम, अहिल्यानगर)

    ॐ शांति

    माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

    अहिल्यानगर दिनांक 2 मेमाजी आमदार अरुण काका जगताप यांचे पुणे येथे निधन झाले असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप माजी जिल्हापरिषद सदस्य सचिन जगताप यांचे ते वडील होते.

    नगर शहराचे नगराध्यक्ष ते विधानपरिषदेचे आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. अरुण काका जगताप हे 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.

    शहरातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगी धाऊन जाणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून अरुणाकाका जगताप यांच्याकडे पहिले जायचे.शुक्रवारी त्यांच्यावर अहिल्यानगर येथील अमरधाम येथे चार वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here