Breaking – परंडा ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा पुन्हा तपास होणार, पोलिसांचे कोर्टात पत्र, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या मागणीला यश

    152

    परंडा येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा पुन्हा एकदा तपास करावा अशी भुमिका घेत पोलीस विभागाने तपासासाठी लेखी पत्र दिले आहे. परंडा गुन्ह्यात प्रयोगशाळा तपासणीत ड्रग्ज ऐवजी कॅल्शियम क्लोराईड सापडले होते त्यानंतर गुन्हा गैरसमजुतीने दाखल झाला असुन तो रद्द करावा अशी भुमिका घेत कोर्टात क समरी अहवाल दाखल केला होता. परंडा येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी सुरु असुन बार्शी पोलिसांनी कारवाई केली त्यानंतर भाजप नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी यात अनेक प्रश्न व मुद्दे उपस्थितीत करीत गुन्ह्याचा तपास नव्याने करावा अशी मागणी केली त्याला यश आले आहे. ड्रग्ज नव्हे ते तर कॅल्शियम क्लोराईड या शीर्षकाखाली दैनिक समय सारथीने या प्रकरणाला समोर आणत पाठपुरावा केला होता. यात ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली, त्यानंतर पोलिसांना कोर्टातील भुमिका बदलावी लागली.

    गुप्त254Тас проку *T&Cs applyमाहीतीबातमीदारामार्फतमिळाल्यावरून सदरच्या गुन्हयात अधिकचा पुरावा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ड्रग्ज बाळगणे, विक्री करणे हे समाज विघातक कृत्या असुन त्यामुळे तरूण वर्ग ड्रग्जच्या आहारी जावुन गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे, तरी पोस्टे परंडा गुरनं 10/2024 कलम 8 (क), 20 (ब) एनडीपीएस ऍक्टमध्ये पाठविलेल्या ‘क’ फायनल मध्ये अधिक तपास करण्याची परवानगी व गुन्हयाचे कागदपत्र मिळण्याची लेखी विनंती धाराशिव पोलिसांनी कोर्टात केली आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी परंडा अतिरिक्त सत्र न्यायालयात पत्र दिले असुन त्यावर कोर्ट काय निर्णय घेत आदेश देते हे पाहावे लागेल, या प्रकरणाची सुनावणी 3 मे रोजी होणार आहे.

    परंडा येथे 19 जानेवारी 2024 रोजी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी क समरी अहवाल दाखल केला होता मात्र आता तपासाला परंडा येथे 19 जानेवारी 2024 रोजी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी क समरी अहवाल दाखल केला होता मात्र आता तपासाला परवानगी देण्याची विनंती केली आहे त्यावर कोर्ट 3 मे 2025 ला निकाल देणार आहे. परंडा प्रकरणात ड्रग्ज पकडण्यात आल्यानंतर प्रयोगशाळा तपासणीत ते कॅल्शियम क्लोराईड सापडले होते, त्यानंतर गुन्हा गैरसमजुतीतुन दाखल झाल्याचा निष्कर्ष काढत गुन्हा रद्द करावा असा लेखी अहवाल 19 मार्च 2025 रोजी दिला, यात 2 आरोपीना अटक केली होती. या प्रकरणात 24 एप्रिल 25 रोजी सुनावणी झाली त्यानंतर पोलिसांनी 25 एप्रिलला पत्र दिले.

    परंडा प्रकरणाची सखोल चौकशी करावी व ती केस मागे घेऊ नये तसेच परंडा शहरात मोठ्या प्रमाणात गावठी पिस्टल आल्या आहेत त्याचा व ड्रग्ज तस्करी रॅकेटचा शोध घेण्यात यावा आशी मागणी भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत केली होती, याबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस अधिक्षक संजय जाधव यांची भेट देखील घेणार आहेत.

    परंडा केसमधील घटनाक्रम व मुद्दे –

    परंडा शहरात 19 जानेवारी 2024 मध्ये झालेल्या ड्रग्ज विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी कारवाईत जप्त केलेले 8.33 ग्रॅम हे ड्रग्ज जप्त केले. इम्रान नसिर शेख व अन्वर उर्फ अण्णा अत्तार या 2 आरोपीना अटक केली त्यातील इम्रानने पोलिसांनी पकडलेले ड्रग्ज असल्याचे मान्य केले तर अण्णा अत्तारने ड्रग्ज इम्रानकडुन सेवनासाठी घेतल्याचे कबुल केले.

    तत्कालीन सपोनि कविता मुसळे यांनी गस्ती करीता रवाना होणेपुर्वी पोकॉ मुलाणी यांना लॅपटॉप, प्रिंटरचे साहित्य, पितळी सील व सील करण्याचे साहित्य घेणेबाबत सुचना केल्या, त्याप्रमाणे साहित्य घेऊन स्टेशन डायरीला नोंद करुन पेट्रोलिंगला गेल्या, जसे की त्यांना त्यादिवशी ड्रग्ज 100 टक्के सापडणार होते हे आधीच माहिती होते.

    अमली पदार्थ ओळखण्यासाठी फील्ड ड्रग्ज टेस्ट किट ही पोलिसांकडे असने व त्याचा वापर करणे अपेक्षित होते मात्र ती न करता थेट ड्रग्ज आहे म्हणुन का गुन्हा नोंद केला. आरोपीचा कॅल्शियम क्लोराईड पावडर जवळ ठेवण्याचा हेतू काय ? त्याचा तपास केला नाही. संवेदनशील प्रकरणात ड्रग्ज नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी एका होमगार्डकडे देणे संशयस्पद (होमगार्ड व आरोपी नातेवाईक) 7 महिन्याच्या अंतराने तपासाअंती दुसऱ्या आरोपीला अटक केली, त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन करण्याची कबुली दिली हे अनुतरित राहिले. आरोपी 1 इम्रान शेख याला 20 जानेवारी 2024 ला नंतर 7 महिने तपास नंतर 26 ऑगस्ट 2024 ला अन्वर उर्फ अण्णा अत्तार याला अटक केली. इम्रानला 6 दिवस, अन्वरला 3 दिवस पोलिस कोठडी मिळाली यात निष्पन्न काय झाले. पोलिसांनी दोन्ही अटक आरोपी यांचे CDR, SDR व इतर तांत्रिक मुद्यावर तपास केला नाही, किंवा तसे कागदपत्रे समोर आले नाहीत. जे नमुने घेतले त्यातील 2 नमुने परंडा पोलिस ठाण्यात आहेत, ते पाठवणे आवश्यक होते, ते केले नाही

    क समरी कोर्टात दाखल व आमदार कैलास पाटील यांच लक्षवेधी उत्तरलीक हे 19 मार्च रोजी झाले, दोन्ही एकाच दिवशी, हा योगायोग, संशयस्पद वाटतो. पोलिसांनी चार्जशीट प्रमाणे 12 साक्षीदार तपासले, त्यात काय निष्पन्न झाले. पोलिसांनी जे जप्त मोबाईल केले त्यात काही डेटा, चॅट, कॉल रेकॉर्डिंग व इतर डिटेल मिळाले का?

    तुळजापूर दोषारोप पत्रानुसार ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी 10 आरोपीवर NDPS कलम 27 चे उल्लंघन केल्याने चार्ज ठेवण्यात आला, तसा परंडा केसमध्ये आरोपी क्रमांक 2 अन्वर उर्फ अण्णा अत्तार याने कबुल केले (पोलिस रिमांड कागदपत्रे नुसार ) की मी ड्रग्ज सेवन करीत होतो व आरोपी 1 कडुन विकत घेतले मग आरोपी 2 वर कलम 27 प्रमाणे कारवाई का केली नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here