… पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषणाकरांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ

पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली”.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातुन शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here