जैन मंदीर चोरी गुन्ह्यातील दोन आरोपी मुद्देमालासह 8 तासात कोतवाली पोलीसांचे ताब्यात

    94

    दि. 08/04/2025 रोजी 10.45 वा. ते दि. 09/04/2025 रोजी पहाटे 05.30 वा. चे दरम्यान श्री. महावीर स्वामी दिगंबर जैन मंदीर, महाजन गल्ली, अहिल्यानगर या मंगोरात अज्ञात चोरट्यांनी मंदीराच्या पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या दरवाजाचे लॉक तोडुन मंदीरात प्रवेश करुन मंदीरात असलेल्या एकून तीन लोखंडी दानपेट्यांतील रोख रक्कम अंदाजे 70,000/- रुपये व मंदीरातील पद्मावती मातेच्या मुलीच्या गळ्यातील साधारण ७ प्रेम वजनाचे 25,000/- रु किं. चे मणीमंगळसुत्र चोरी केले होते. जैन मंदीर अध्यक्ष महावीर झुंबरलाल बडजाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीचे विरुच्य कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर गु.र.नं. 331/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (ड) अन्वये दि. 09/04/2025 रोजी 15.03 वा. दाखल करण्यात आला होता.जैन मंदीर चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने तसेच दि. 10/04/2025 रोजी भगवान महावीर जयंती असल्याने जैन बांधवांच्या धार्मिक भावना तसेच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटणाठिकाणी भेट दिली. गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे म.पो.हे.कॉ. रोहीणी दरंदले यांचेकडे देण्यात आला. गुन्हे शोध पचकांचे अधिकारी अंमलदार यांनी घटणाठिकाणी भेट दिली. गुन्ह्याचे तपासात तांत्रीक विश्लेशन तसेच गुप्त बातमीदारा यांचे मार्फतीने मिळालेल्या बातमीचा आधारे गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे भिमा कोरेगाव, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे असल्याची माहीती मिळालेवरुन तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे पथकासह मा. पोलीस निरीक्षक सी यांचे आदेशाने खाजगी वाहनाने रवाना झाले. भिमा कोरेगाव येथे गुन्ह्यातील दोन संशयीत आरोपी नामे १) सुरज उर्फ सोमनाथ राजु केदारे, बय 21 वर्षे, रा. बोल्हेगाव, ता. जिल्हा- अहिल्यानगर, २) मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे, वय 20 वर्षे, रा. वैष्णवनगर, केडगाव, ता. जिल्हा अहिल्यानगर हे मिळून आले. दोन्ही आरोपीतांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरी गेला माल आरोपी अ.ने. १ यांचे रहाते घराजवळून पंचासमक्ष काढून हजर केल्याने तो तपास अंमानदार म.पो.हे.कॉ. रोहीणी दरंदले यांनी जप्त केला. जप्त मुद्देमालात १) 10,000/- रु किं. चे पद्मावती मातेच्या मुर्तीच्या गळ्यातील सोन्याचे दोन पळ्या व चार मनि असे काळे बारिक मन्यात ओवलेले मनिमंगळसुत्र सुस्थितीत असलेले, २) 16,115/- रु रोख रक्कम त्यात विविध दराच्या भारतीय चलणी नोटा, ३) 500/- रु कि.ची लेदर बेंग असा एकून 26,615/- रु किं.था मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपीतांना अटक करतेवेळी त्यांचे अंगझडतीतून त्यांचेकडील दोन मोबाईल असे जप्त करण्यात आले आहे. अटक दोन्ही आरोपीतांना गुन्ह्याचे तपासात पोलीस कस्टडी रिमांड मिळणेकामी मा. न्यायालयात दाखल केले असता त्यांची दि. 12/04/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.उपरोक्त गुन्ह्यातील अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 62/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), 331 (३) प्रमाणे दाखल गुन्ह्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल त्यांचे घरी ठेवल्याचे सांगितले. आरोपी अ.नं. १ सुरज उर्फ सोमनाथ राजु केदारे याचे वडील / साक्षीदार राजु बन्सी केदारे यांनी तो पंचासमक्ष हजर केलेवरुन गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल 80,000/- रु कि.ची सोन्याची बटनाचे आकाराची लगड साधारण १ तोळा वजनाची असलेली आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री. अमोल भारती, सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि कुणाल सपकाळे, पोउपनिरी गणेश देशमुख, म.पो.हे.कॉ. रोहीणी दरंदले, पो.हे. कॉ. विशाल दळवी, संदिप पितळे, सलीम शेख, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, अभय कदम, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, राम हंडाळ, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, महेश पवार, सोमनाथ केकाण, सोमनाथ राऊत, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो. कॉ. राहुल गुंडु यांनी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here