RBI कडून अत्यंत महत्त्वाची घोषणा कर्ज होणार स्वस्त; सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा

    87

    रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना दिलासा दिला असून रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रेपो रेट आता 6 टक्के झाला आहे. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. आज पतधोरण बैठकीत हा निर्णय घेतला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे.

    या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल. ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त होऊन खरेदीला प्रोत्साहन मिळेल. गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्ज अधिक स्वस्त होणार असून कर्ज घेतलेल्यांनाही मासिक इएमआयमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 6.7 टक्क्यांनी वाढेल असं सांगण्यात आलं आहे. या वर्षी इन्फेशन म्हणजेच महागाईचा दर हा 4.2 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे.आरबीआय ही देशातील बँकांची बँक असून ही केंद्रीय बँक सर्व बँकांना वित्तपुरवठा करते. ज्या दरानं किंवा ज्या टक्केवारीनं आरबीआयकडून इतर बँकांना कर्ज दिलं जातं त्या आकडेवारीला रेपो रेट असं म्हटलं जातं. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास आरबीआयकडून बँकांनाच महागड्या दरात कर्ज मिळणार असा त्याचा थेट अर्थ होतो. परिणामी गृहकर्जापासून खासगी कर्जामध्येही व्याजदर वाढ होते. मात्र रेपो रेट कमी झाल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होतो.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here