बंगळूर* – कर्नाटकच्या सत्तारूढ भाजपमधील धुसफूस वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्या पक्षाचे वजनदार नेते आणि ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. त्यातून त्यांनी बी.एस.येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात असल्याचे संकेत दिले आहेत. तर, येडियुरप्पा समर्थकांनी यत्नाल यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यातून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होत असल्याने कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता बळावली आहे. कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चा वारंवार पुढे येत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने 77 वर्षीय येडियुरप्पा यांचे वाढते वय कारणीभूत ठरत आहे. त्याशिवाय, भाजपमध्ये उत्तर कर्नाटक विरूद्ध राज्याचा उर्वरित भाग अशी गटबाजी सुरू असल्याचेही सातत्याने दिसून येत आहे. अशातच यत्नाल यांनी येडियुरप्पा यांच्याविरोधात बंडाचे संकेत दिले आहेत. उत्तर कर्नाटकमधील जनतेच्या पाठिंब्यामुळे भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या विभागातून मोठ्या संख्येने भाजपचे आमदार निवडून आले. त्याची जाणीव पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही आहे. येडियुरप्पा यांचा वारसदार उत्तर कर्नाटकातील असावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनात आहे. त्यामुळे येडियुरप्पा फार काळ मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असे यत्नाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यत्नाल यांच्या दाव्यावर प्रदेश भाजपमधूनच तीव्र प्रतिक्रिया उमटली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी यत्नाल यांचा दावा फेटाळून लावला. पुढील तीन वर्षे मुख्यमंत्रिपदावर येडियुरप्पाच राहतील, असे त्यांनी म्हटले. तर येडियुरप्पा यांच्या एका समर्थक आमदाराने यत्नाल स्वप्न पाहत असल्याची खिल्ली उडवली. त्यामुळे सत्तारूढ गोटातील तीव्र मतभेदही चव्हाट्यावर आले.
ताजी बातमी
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे अथवा मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२5या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्याचे विभाजन...
नगरमध्ये शाळेतच अल्पवयीन धर्मांतराचा प्रयत्न? आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अहिल्यानगर : शहरातील एका खाजगी शिक्षणसंस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल...
अहिल्यानगर शहरातील हॉटेल्सची पाहणी करणार मनपा आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरातील अनेक विविध हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थांच्या माध्यमातून...
चर्चेत असलेला विषय
नगरमध्ये घडली ‘ही’ धक्कादायक घटना; पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
जमावाने चोर समजून केलेल्या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यासह चार जण गंभीररित्या जखमी झाल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात...
व्हिडिओ: हिमाचलच्या किन्नौरमध्ये भूस्खलनाने रस्त्याचा एक भाग सोबत घेतला
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात अवकाळी पावसामुळे वारंवार भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. ताज्या किन्नौर जिल्ह्यातील भूस्खलनाने भाबा...
दहा लाखाची लाच घेताना ‘या’ चेअरमन ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले!
दहा लाखाची लाच घेताना ‘या’ चेअरमन ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले!
युनिट- औरंगाबादतक्रारदार- पुरुष, वय-48, व्यवसाय – किराणा...
लग्नाच्या वऱ्हाडाचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू
नांदेड- विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात टाटा मॅजिक गाडीमधील ४ जणांचा...





