“तो कसा मंत्री राहतो तेच बघतो”, रुपाली ठोंबरेंनी शेअर केलं आव्हाडांचं कथित चॅट; आमदार खुलासा करत म्हणाले…

    99

    Jitendra Awhad Reacts on Rupali thombare Alleged WhatsApp Chat Shivraj Bangar : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. वाल्मिक कराड हा या हत्येमागचा सूत्रधार असल्याचा आरोप बीडमधील जनता व अनेक लोकप्रतिनिधिंनी केला आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे व त्यांचा पक्ष (अजित पावारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) वाल्मिकला पाठिशी घालत असल्याचा आरोपही होत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला अटक करावी, देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी या मोर्चाच्या उद्दीष्टांवर शंका उपस्थित केली आहे. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

    ठोंबरे यांनी एक्सवर एक कथित व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड व बीडमधील रहिवासी शिवराज बांगर यांच्यामधील हे चॅट असल्याचा दावा ठोंबरे यांनी एक्सवर केला आहे. यासह ठोंबरे म्हणाल्या आहेत की “सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी ते जितेंद्र आव्हाडांनी सांगून टाकावं”.

    चॅटमध्ये नेमकं काय आहे?

    या चॅटमधील व्यक्ती म्हणतेय की “उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज, मी पहिली तुझी भेट घेईन, नंतर मोर्चा कडे जाईन. मुंडे व वाल्याविरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर, पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळ पासून प्रयत्न करतोय.

    यावर शिवराजचं उत्तर : सुरु आहे फोन माझा…५१५१ बंद आहे तात्पुरता… मी सगळी तयारी केलीय

    आव्हाडांचा कथित मेसेज : बरं, मोर्चात मुस्लीमआणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा,

    पैशाची काळजी करू नको. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे त्याला ही संधी द्यावी मी सांगितलं आहे. कसं, काय, कुणावर बोलायचं… उद्या मुंडे ला घो* लावू… कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू आता…

    शिवराजचं उत्तर : याचीच वाट पाहतोय मी… किती वाजता पोहोचताय तुम्ही?

    जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

    दरम्यान, रुपाली ठोंबे यांची पोस्ट रिपोस्ट करत आव्हाडांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट मॉर्फ करून वायरल यांच्यासोबतचे न केलेले चॅट मॉर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या अॅड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असूनदेखील सत्य – असत्य न तपासता त्यांनी हे मॉर्फ केलेलं चॅट वायरलं. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपलं आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हे चॅट या भूमीवर अवतरलं. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला?”

    “असो, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविला आहे.ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे. तो शिवराज बांगरच्या कुटुंबियांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्या कराडने जंगजंग पछाडले. शिवराज बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलीसही त्याच्यावर पटापट गुन्हे नोंदवितात. सर्वात हास्यास्पद गुन्हा म्हणजे, शिवराज बांगर याने वाल्या कराडकडून खंडणी मागितली, आहे की नाही विनोद!”

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here