
दिनांक 26/12/2024 रोजी रात्री 8-30 वा.चे सुमारास उमेश झुंबरलाल नहार वय 43 वर्षे, धंदा-व्यापार रा.शिवाजीनगर, गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांचे मालकीची 5,50,000/- रु. किंमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी नंबर एमएच-20-ईई-1828 ही अज्ञात चोरटयाने लबाडीचे इराद्याने चोरुन नेलेबाबत गंगापुर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 586/2024 भा.न्या.सं. 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयात चोरीस गेलेली वरील स्कॉर्पिओ गाडी ही दिनांक 28/12/2024 रोजी खरवंडी ते पाथर्डी रोडने पाथर्डी शहराकडे येत असलेबाबत नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे डायल 112 डयुटीसाठी असलेले पोकॉ 631 अरुण निळे यांना कळविल्याने त्यांनी सदरचा प्रकार श्री. हरिश भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाथर्डी पोलीस स्टेशन यांना कळविल्याने सपोनि. श्री. हरीश भोये यांनी पोकॉ .631 अरुण निळे, पोकॉ, 1678 निलेश गुंड, पोकॉ.62 संजय जाधव, पोकॉ. 372 अल्ताफ शेख यांना सोबत घेवुन पाथर्डी खरवंडी रोडवर पाथर्डी शहरातील पोळा मारुती मंदीराजवळ नाकाबंदी लावुन सदरची स्कॉर्पिओ गाडी थांबवुन आरोपी नामे संतोष ओंकार गायकवाड वय 26 वर्षे रा. तलवाडा ता. गेवराई जि.बीड यांस स्कॉर्पिओ गाडीसह ताब्यात घेवून पाथर्डी पोलीस स्टेशनला आणले. व सदरबाबत पोलीस निरीक्षक, गंगापुर पोलीस स्टेशन जि. छत्रपती संभाजीनगर यांना कळवुन सदरची स्कॉर्पिओ गाडी ही आरोपीसह गंगापुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांचे ताब्यात देण्यात आली आहे.सदरची कारवाई ही मा.श्री. राकेश ओला साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. सुनिल पाटील साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये,पोकों. 631/अरुण निळे, पोकॉ. 1678 निलेश गुंड, पोकॉ.62/ संजय जाधव, पोकॉ. 372/अल्ताफ शेख सर्व नेमणुक पाथर्डी पोलीस स्टेशन यांनी केली आहे.






