ई व्ही एम हटाव. .देश बचाव च्या स्वाक्षरी अभियानास शेवगाव शहरात उस्फुर्तपणे प्रतिसाद शेकडो लोकांनी नोंदवला निषेधई व्ही एम हटाव. .देश बचाव च्या स्वाक्षरी अभियानास शेवगाव शहरात उस्फुर्तपणे प्रतिसाद शेकडो लोकांनी नोंदवला निषेध

    92

    शेवगाव (प्रतिनिधी )-या बाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीयअध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात ईव्हीएम विरोधात मतदारांची स्वाक्षरी मोहीम दि ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे या अनुषंगाने आज शेवगाव येथे शहर व तालुक्यातील अनेक स्वाभिमानी मतदारांनी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीमेत उपस्थिति दर्शवली शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा किसन चव्हाण यांनी प्रथम स्वाक्षरी करून तालुक्यातील स्वाक्षरी अभियानास सुरुवात झाली शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल हा अनपेक्षित आणि चमत्कारिक लागलेला असून हा निकाल भाजपने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएम या यंत्राच्या माध्यमातून लावून घेतलेला आहे, अशा निकालाने देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात असून तिचा गळा घोटण्याचाच प्रकार भाजप सत्तेचा गैरवापर करून करत आहे त्यामुळे ईव्हीएम हटाव देश आणि देश बचाव यासाठी यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपर घेण्यात याव्या यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार आहे. यावेळी वंचित चे अरुण पाटील झांबरे, ऑगस्टीन गजभीव, लक्ष्मण मोरे, शेख सलीम जिलाणी, गणेश बोरुडे, संभाजी कुसळकर,भिमा गायकवाड, सुरेश खंडागळे, नितीन गुंजाळ, पप्पू गर्जे, संजय चव्हाण, ज्ञानेश्वर पिटेकर, सुंदर आल्हाट,प्रमोद गजभीव ,भिमराज लक्ष्मण फडके, पठाण महेमुद याकुबभाई ,शेषराव आव्हाड, सतिश शेषराव ठोंबे,दिलिप वाघमारे व ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते*ताजा कलम**या निमित्ताने व्ही. व्ही. पॅट मशीन मधुन प्रिंट होऊन बाहेर पडणाऱ्या चिन्हांच्या स्लिप चि जरी कॉऊंटिंग केली तरी सत्ताधाऱ्यांचे पितळ उघड पडणार आहे निवडणूक आयोग त्या सर्व स्लीप क्रश करण्याची घाई का करत असते ??? आणि त्या बाबत कमालीची गोपनीयता का बाळगली जाते ??? हे प्रश्न कोणालाच पडत नाहीत व हे एक ना उलगडणारे कोडे आहे. हे सरकार युतीचे सरकार नसून ईव्हीएम सरकार आहे अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here