बीसीसीआयची मोठी घोषणा!
15 डिसेंबरला पुन्हा ऑक्शन होणार भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आयपीएलनंतर आता डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी ऑक्शन होणार आहे. ? बंगळुरु येथे 15 डिसेंबरला दुपारी 3 वाजता मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. तसेच डब्ल्यूपीएला 2023 पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ खेळतात.
नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायजी आपल्या टीममध्ये जास्तीत 18 खेळाडू ठेवू शकते. तसेच परदेशी खेळाडूंबाबतची कमाल मर्यादा ही प्रत्येक संघासाठी 6 इतकी आहे. मिनी ऑक्शनआधी प्रत्येक संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यामुळे करारमुक्त आणि नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.



