▪️ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.?
▪️ यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला असून याचेच पडसाद आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. तर आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन देखील करण्यात आलं.
▪️ सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात होता. पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आलं. तेव्हा मारकडवाडीतील लोकांनी मॉक पोल मागितला. तो होऊ दिला नाही. त्यामुळे जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही. उद्या आम्ही शपथ घेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.




