
या बाबत सविस्तर वृत्त असे की कन्नड विधासभा मतदार संघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा त्यांच्याच माजी पत्नीने दारुण पराभव केला हे भाजपचे रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत, म्हणजे हर्षवर्धन जाधवांचे सासरे रावसाहेब दानवे सुद्धा खासदार राहिले आहेत. स्वतः हर्षवर्धन जाधव मागील आमदार राहिलेले आहेत, मागच्या 2019 च्या लोकसभेला ते उभा राहिल्याने 4 वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे पडले. ( जाणूनबुजून पाडले ).आताच्याही निवडणुकीत त्यांच्याच पत्नीने म्हणजे रावसाहेब दानवेंच्या मुलीने संजना हर्षवर्धन जाधव यांनच त्यांचे पती हर्षवर्धन जाधव यांचा दारुण पराभव केला आहे.( दोघांचे वयक्तिक वाद आहेत तो भाग वेगळा ) इतकेच नव्हेतर, दानवेंचा मुलगा म्हणजेच हर्षवर्धन जाधव यांचा साला ही 2 ते 3 वेळा आमदार झाला आहे. आणि इकडे हे दोन येडे कार्यकर्ते हर्षवर्धन जाधव हरले म्हणून विषारी औषध पेले आहेत. एक जण पिला, त्याला बघायला गेलेला दुसरा ही पेला! एवढी वेडी लोकं समाजात आजही आहेत! विविध पक्षातील राजकीय सोयरीक सर्वांना माहित आहे कोण कोणाचे व्याही कोण कोणाचे सासरे जावई कोण कोणाचे मामा भाचे कोण कोणाचे आंतराजतीय विवाह करून झालेले नवीन सोयरे पण राजकीय स्टेज वरून एकमेकांना शिव्यांची लाखोळी वाहणारे मुंबईत डिनर एकत्र करतात आणि इकडे गावाकडे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या विजयासठी चपला सोडतात देवाला नवस करतात कोणी विषाची बाटली मोकळी करतात याला म्हणतात येड्याचा बाजार आणि पेढ्याचा पाऊस निवडून लढण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे पण जिंकन्याचे स्वातंत्र्य फक्त गडगंज श्रीमंतांना आहे 288 मध्ये किती गरीब आमदार झाले जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते.
*दारू तीच बाटली आणि लेबल नवीन महाराष्ट्राने यंदा काका -पुतण्या, नवरा -बायको, बाप -मुलगा, सासरे -जावई, भाऊ -भाऊ लढती पहिल्या पण सर्वसामान्य एकमेकांची डोके फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना हे कळलेच नही गुलाल त्यांच्याच घरात गेला तुम्ही फक्त बाह्य वर करून करून माझाच नेता कसा महान आहे मी त्याच्यासाठी जीव देईन अरे बाळा तुला बायको रोज सकाळी झाडूने हानती हे ध्यानात घे आधी*