
नगर : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगवले (Gauri Ingavale) हे त्यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रेयस तळपदेच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशामध्ये श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एकावर एक तिकीट फ्रीची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला कुटुंबासोबत हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
१ मार्चला चित्रपट रिलीज होणार (Shreyas Talpade)
१ मार्चला म्हणजे उद्या हा चित्रपट रिलीज होणार असून फक्त उद्यासाठी ही ऑफर असणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या माणसाच्या सोबतीने पाहा ही अनोखी गाठ, अशी खास टॅगलाईन देऊन या ऑफरची घोषणा केली आहे. प्रेक्षकांना बूक माय शोवर जाऊन या चित्रपटाच्या तिकीटाचे बुकींग करायचे आहे. यासाठी तुम्हाला HEAGBOGO हा कोड वापरायचा आहे. तरच तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे. या कोडच्या माध्यमातून तुम्ही एकावर एक तिकीट मिळवू शकता.झी स्टुडिओ मराठीने देखील इन्स्टाग्रामवर या चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही अनोखी गाठ’ची प्रेक्षकांना १ वर १ फ्रीची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा.
श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र काम करणार (Shreyas Talpade)
‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या माध्यमातून श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा ही देखील महेश मांजरेकर यांचीच आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर या चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.




