Lake : खानापूर पाझर तलाव २० वर्षानंतर प्रथमच भरला

    125

    Lake : श्रीरामपूर : तालुक्यातील खानापूर येथील सोमय्या फार्मजवळ असलेल्या नवीन गावठाण येथील पाझर तलाव (Lake) २० वर्षानंतर प्रथमच भरला आहे. आमदार लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांच्या विशेष प्रयत्नाने हा तलाव भरला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांना यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही (Drought conditions) मोठा आधार झाला आहे.

    शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान (Lake)


    सोमा फार्म नवीन गावठाण येथील पाझर तलावात पाणी सोडावे, यासाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आमदार कानडे व माजी नगरसेवक अशोक कानडे यांची भेट घेऊन तलाव भरून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार कानडे यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तलाव भरण्याची तसेच तीन चारी दुरुस्त करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तीन चारी दुरुस्ती करून पाझर तलावात पाणी सोडले. त्यामुळे हा तलाव २० वर्षानंतर प्रथमच भरल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

    शेतीसाठी असलेला पाणी प्रश्न काही प्रमाणात दूर (Lake)


    पाझर तलावाशेजारी खानापूर गावच्या पाणीपुरवठा योजनेचा बोरवेल असून भविष्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून तसेच परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या हेतूने अमोल आदिक, ज्ञानदेव आदिक, निलेश आदिक यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे अखेर वीस वर्षानंतर प्रथमच पाझर तलाव भरण्यात आला. पाझर तलावात पाणी आल्याने पाणीपुरवठ्याच्या बोरवेलला पाणी वाढेल तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी असलेला पाणी प्रश्न काही प्रमाणात दूर होईल, असे अमोल आदिक यांनी सांगितले.


    पाझर तलावात पाणी सोडल्याने आमदार कानडे, अशोक कानडे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संजय कल्हापुरे, श्रीमती कुऱ्हाडे, कालवा निरीक्षक रावसाहेब आडसरे यांचे ज्ञानदेव आदिक, निलेश आदिक, ईसाक शेख, बाबासाहेब जाधव, बाबासाहेब जगताप, जालिंदर तांबे, गोरख तांबे, एकनाथ गाढे, नवनाथ तांबे, दादासाहेब चौधरी, काकासाहेब चौधरी, राम दाणे, रामनाथ जाधव, दीपक गाढे, संजय तांबे, भाऊसाहेब जाधव, दीपक गाढे, रवी पारखे, चंद्रकांत जगताप, शाहरुख शेख, भाऊराव आदिक, प्रशांत आदिक, नवनाथ आदिक, गणेश आदिक, रवि थोरात, बाबासाहेब आदिक, योगेश आदिक यांनी धन्यवाद दिले आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here