
Manoj Jarange Patil : नगर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर विषप्रयाेग हाेऊ शकताे, असा खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, सलाईन, इंजेक्शन आणि जेवण तपासून द्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता (Chances of an accident) असल्याचंही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
…तर आंदाेलनाची दिशा बदलणार (Manoj Jarange Patil)
मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपाेषणाला बसले आहे. मराठा बांधवांच्या आग्रहामुळे त्यांनी औषधाेपचार सुरू केला आहे. २० फेब्रुवारी सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बाेलवले आहे. यात सगेसाेयऱ्याचा कायदा लवकरात-लवकर पारित करावा, अशी मागणी मनाेज जरांगे पाटील यांची आहे. २० फेब्रुवारीपर्यंत कायदा पारित न झाल्यास आंदाेलनाची दिशा बदलण्याचा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
आंबेडकरांचा सल्ला (Manoj Jarange Patil)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचं पाऊल घेतलं असल्याचं दिसत आहे. त्यांना जी काही औषधं, सलाईन, जेवणं, ज्यूस दिला जात आहे, ते आधी तपासलं जावं. यानंतरच त्यांना या गोष्टी दिल्या जाव्यात. राज्य सरकार अशी व्यवस्था करेल, अशी अपेक्षा मी करत आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना १० ते १५ लोकांमध्ये बसून जेवण करू नये, असा सल्ला दिला होता.