अहमदनगर ,टीम,22 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता.
त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती
अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती.
त्यातील एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आणखी एक चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.




