Crime News : विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करणारा विकृत शिक्षक तुरुंगात

    192

    Crime News |  नगर : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिक्षक (Teacher) यांना विद्यार्थी आपले गुरूच मानतात. मात्र, या पवित्र नात्याला काळिमा फासण्याची अत्यंत धक्कादायक घटना नगर (Ahmednagar) शहरातील एका महाविद्यालयात घडली आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण देतो मात्र, त्याबदल्यात विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी एका शिक्षकाने केली, अशा आशयाची फिर्याद संबंधित पीडित विद्यार्थिनीने तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षकाला अटक करण्यात आली. 

    याबाबत अधिक माहिती अशी, बारावीच्या कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ५ फेब्रुवारीला संबंधित शिक्षकाने मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत २० पैकी २० गुण हवे असतील तर मी देतो परंतु त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? असे तो शिक्षक म्हणाला. संबंधित विद्यार्थिनीने या विषयावर भाष्य करणे टाळत त्याठिकाणाहून निघून गेली. त्यानंतर पुन्हा एकदा संबंधित शिक्षक कॉलेजच्या परिसरात पुन्हा आपल्याकडे अशीच मागणी केली तेव्हाही मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.  

    शून्य गुण दिल्याचा आरोप (Crime News)

    आपण त्या शिक्षकाला टाळत असल्याने शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्याने शून्य गुण दिले. त्यामुळे ८ फेब्रुवारीला मी त्याला त्यासंबंधी विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करीत पुन्हा तशीच मागणी केली. माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे मला जाणवले गेले. त्यामुळे मी तेथून निघून गेले. बदनामीच्या भीतीने याबाबत मी कोणाशीही चर्चा केली नाही. दुसऱ्या दिवशी मी आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

    गुन्हा दाखल (Crime News)

    दरम्यान, याबाबत पीडित विद्यार्थिनीने नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here