
Prize Distribution : नगर : नगर महापालिका (AMC) व हायजिन फर्स्ट (Hygiene first) आणि आय लव्ह नगर (I love Nagar) यांच्या संयुक्त विद्यमाने खाद्य संस्कृती उत्कृष्ट दर्जाची असावी तसेच सर्वांना चांगले व स्वच्छ शुद्ध अन्न मिळावे या हेतूने शहरात १ ते २६ जानेवारी पर्यंत हॉटेल, बेकरी, हातगाडी व्यावसायिकांना सहभागी करून घेत स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण (Prize Distribution) १० फेब्रुवारीला होणार आहे.
१० फेब्रुवारीला सन्मानित करण्यात येणार (Prize Distribution)
या स्पर्धेतून किचन स्वच्छतेचे आवश्यक ते धडे देत बदल करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. याचबरोबर हायजिन फर्स्ट खाद्यपदार्थ क्षेत्रात चळवळ उभी राहण्यास मदत झाली. यातील विजेत्या व्यावसायिकांना १० फेब्रुवारी रोजी माऊली संकुल येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हायजिन फर्स्टचे वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टेक्नॉलॉजी अँड इनोवेशन द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आयुक्त डॉ. पंकज जावळे, आय लव्ह नगरचे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया आदी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती हायजिन फर्स्टच्या वतीने देण्यात आली.
हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन (Prize Distribution)
विद्यार्थ्यांसाठी किचन स्वच्छतेचा उपक्रम यावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभाग अंतर्गत असणाऱ्या अनुदानित मुलामुलींच्या वसतिगृहात किचन स्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात आलाय, तरी अशा आगळ्यावेगळ्या सोहळ्याला नगरकरांनी व हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हायजिन फर्स्टच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९४२००२८२१२


