
BJP : कर्जत : राष्ट्रवादीचे नेते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला (NCP) रामराम ठोकला आहे. आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या उपस्थितीत चोंडी येथे राळेभात यांनी समर्थकांसह भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.
आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का (BJP)
पवनराजे राळेभात यांचा भाजप प्रवेश आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग आहे. त्यामुळे याचा जामखेड शहरात भाजपला फायदा होईल.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (BJP)
यावेळी भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, सचिन पोठरे, माजी उपसभापती दादासाहेब रिठे, गौतम उत्तेकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, तात्याराम पोकळे, संपत राळेभात, सरपंच संजीवनी पाटील, सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, राहुल पाटील, प्रवीण सानप, मोहन डॉ. विठ्ठल राळेभात आदी उपस्थित होते.