Shaitaan Teaser : अजय देवगणच्या ‘शैतान’चा टीझर प्रदर्शित; नक्की पहाच !

    140

    नगर : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या ‘शैतान’ (Shaitaan Movie) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अजय देवगण, ज्योतिका आणि आर. माधवन ही स्टारकास्ट या थ्रिलर चित्रटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

    अजय देवगणच्या ‘शैतान’चा थरकाप उडवणारा टीझर (Shaitaan Teaser)

    पॅनोरमा स्टुडिओने ‘शैतान’ या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये अजय आणि ज्योतिका घाबरलेले दिसत आहेत. शेवटी आर माधवनच्या भयानक हास्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अजयने टीझर शेअर करताना लिहिले की, ‘तो तुम्हाला विचारेल एक खेळ खेळणार का ? पण त्याच्या बोलण्यात येऊ नका.’

    ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रिमेक ‘शैतान’ (Shaitaan Teaser)

    ‘शैतान’ चित्रपट २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे. शैतान हा चित्रपट ८ मार्च २०२४  रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणने बुधवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले होते. यामध्ये अजय देवगणसह चित्रपटातील इतर स्टार्सचाही फर्स्ट लूकही पाहायला मिळाला आहे. ब्लॅक मॅजिक आणि थरार यांचं मिश्रण असलेल्या ‘शैतान’च्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here