Manoj Jarange Patil : आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे पाटील

    132

    Manoj Jarange Patil : पारनेर : शासनाला (Government) सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा (Maratha society) अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. सुपा (ता.पारनेर) येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठी बांधवांना संबोधित केले, यावेळी ते बोलत होते.

    सुमारे १७० एकर क्षेत्रावर बसण्याची व्यवस्था (Manoj Jarange Patil)

    जरांगे पाटील म्हणाले, सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे की, मी तुमच्या जीवावर मुंबईकडे कुच करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी गुलाल घेऊनच घरी येईल. मी मरणाला भीत नाही, आता माघार नाही, सरकारने लय प्रयत्न केले, पण मी मॅनेज होणाऱ्यातला नाही, म्हणून त्यांचे फगाणा. आता मात्र मुंबईत भगवे वादळ निर्माण होणार यात शंका नाही. आर्धी लढाई आपण जिंकलो आहे, आता फक्त थोडी लढाई बाकी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, मी असेन किंवा नसेल तुम्ही मात्र एकत्र रहा. का देत नाही, आपण घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून सुरूवात झाली आहे. सोमवारी (ता.२२) पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर हे भगवे वादळ धडकताच पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने  सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

    रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महासागर (Manoj Jarange Patil)

    पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील मराठी बांधवांच्या वतीने नाष्टा व भोजनासाठी सुमारे ५१ स्टॉल लावण्यात आले. यामध्ये केळी, शाबुदाना खिचडी, लापशी, मसाले भात, भाकरी, चपाती, मिरची,बेसण, दाळी आदींच्या गाड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यादरम्यान संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महासागर उसळला होता. तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.मराठा मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातून जात असून नगर- पुणे महामार्गावरील सुपा परिसरात या मोर्चाचे दुपारचे भोजन सुपा येथे करण्यात आले. अतिशय नियोजनबद्ध  मोर्चे करांच्या अन्न, पाणी, व इतर सोयीसुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली.  यामध्ये  महिला पुरुष यांची वेगवेगळी व चार ते सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. पुढील मुक्काम हा रांजणगाव गणपती (ता. शिरूर, जि. पुणे) येथे होणार असून सायंकाळी उशिरा शिरूरच्या दिशेने पदयात्रेचे प्रस्थान झाले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here