Hunger strike : नगरपंचायतची रिक्त पदे तत्काळ भरा; अन्यथा तहसीलमध्ये उपोषण

    173

    Hunger strike : कर्जत : नगरपंचायतीला केवळ राजकीय (Political) द्वेषापोटी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबली गेली आहे. मागील दीड वर्षापासून मुख्याधिकारी पदासह अनेक महत्वाची पदे रिक्त आहे. सदरची पदे तत्काळ न भरल्यास कर्जत नगरपंचायतीचे (Nagar Panchayat) सर्व पदाधिकारी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण (Hunger strike) करणार असल्याचा इशारा गटनेते संतोष मेहेत्रे यांनी दिला.

    दीड वर्षांपासून मुख्याधिकारी पद रिक्त (Hunger strike)


    या आशयाचे निवेदन कर्जत तहसीलदार यांना देण्यात आले.
    कर्जत नगरपंचायतीमध्ये मागील दीड वर्षांपासून मुख्याधिकारी पद रिक्त असून त्याचा भार प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पदाधिकाऱ्यांचे अनेक कामे खोळंबली आहे. तसेच नगरपंचायत हद्दीतील विकासकामे देखील प्रलंबित पडले आहे. याच पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी उपोषण केले होते. यावेळी आपल्या तीव्र भावना महाराष्ट्र शासनास कळवू, असे लेखी आश्वासन दिले असताना आजमितीस देखील कायमस्वरूपी मुख्याधिकारी कर्जत नगरपंचायतीला देण्यात आला नाही.

    प्रशासकीय कामात अडचणी (Hunger strike)

    मुख्याधिकारी पदासह अभियंता, लेखापाल, नगर रचना सहायक लेखा परीक्षक आदी पदे रिक्त आहे. वरील रिक्त पदामुळे शहरातील नागरिकांना अनेक प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होत असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वास्तविक पाहता कर्जत नगरपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची केवळ विरोधकांच्या राजकीय द्वेषापोटी दयनीय अवस्था झाली आहे. वरील पदे तत्काळ न भरल्यास प्रजासत्ताक दिनीच २६ जानेवारीला आमरण उपोषण करण्याचा इशारा सत्ताधारी राष्ट्रवादीचे गटनेते संतोष मेहेत्रे यांच्यासह नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्या स्वाक्षरीचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांना दिले. यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमे, प्रसाद ढोकरीकर, राजेंद्र पवार, सुनील शेलार, लाला शेळके, रवी सुपेकर उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here