
संगमनेर : तालुक्यातील पाेलिसांनी मोहीम राबवून सावरचाेळ येथील रानवारा हाॅटेलजवळ (Ranvara Hotel) छापा टाकून देशी-विदेशी दारुचा (Domestic and foreign liquor) पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार (ता. १६) रात्री ८ वाजता करण्यात आली. याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईत दाेन लाख ७४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Crime)
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरचोळ येथे रानवारा हॉटेल जवळ अजय शांताराम वाकचौरे (रा. निमरळ, ता. अकोले) देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून चार चाकी वाहन तसेच देशी-विदेशी दारुच्या एकूण दाेन लाख ७४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अजय शांताराम वाकचौरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहेत.




