
Accident : संगमनेर : शहरात आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मोपेडवरून रस्ता (Road) ओलांडताना महिलेच्या दुचाकीला मालट्रकची धडक बसली. या भीषण अपघातात (Accident) दुचारी चालक महिला वाहनाच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू (Death) झाला. नीतू सोमनाथ परदेशी (वय 37, रा.पानसरे गल्ली, नेहरु चौक) असे मृत महिलेचे नाव आहे.
महामार्ग ओलांडताना धडक (Accident)
आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास एक रिकामा मालट्रक बसस्थानकांकडून दिल्ली नाक्याकडे जात होता. या मालट्रक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आला. त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्या मोपेडवरुन महामार्ग ओलांडत असताना नीतू परदेशी यांच्या मोपेडला ट्रकची धडक बसली. यात परदेशी पाठीमागील चाकाखाली सापडून चिरडल्या गेल्या.
उपचार सुरु होण्यापूर्वी मृत्यू (Accident)
या घटनेनंतर आसपास जमलेल्या नागरिकांनी धाव घेत जखमी झालेल्या महिलेला तातडीने खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत संगमनेर शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.