Swachh Bharat Abhiyan: स्वच्छतादुत हरिभाऊ उगले यांनी एक हजार गावांना केले स्वच्छ

    111

    Swachh Bharat Abhiyan: श्रीगोंदा : राष्ट्रसंत गाडगेबाबा (Rashtrasant Gadgebaba) यांनी अध्यात्माबरोबर स्वच्छतेच्या (Cleanliness) माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन (Enlightenment) केले.आजही त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आजच्या समाजाला संत व महापुरुषांच्या विचारांची शिकवण नव्यानं देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे विचार स्वच्छतादूत हरिभाऊ उगले (Haribhau Ugale) यांनी व्यक्त केले आहेत. स्वतः हातात खराटे, फावडी, घमेली घेत अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील हरिभाऊ ज्ञानोबा उगले हे संपूर्ण राज्यभर भटकंती करून परिसर स्वच्छतेसह लोकांच्या मनाचीही स्वच्छता करत आहे. श्रीगोंदा शहराची मागील दोन दिवसापासून उत्स्फूर्तपणे स्वच्छता करताना येणारे जाणारे नागरिक आवर्जून त्यांची चौकशी करत त्यांचे कौतुक करत आहेत.

    अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ उगले यांनी डोंगरगाव येथे ३८ वर्ष शेतीकरत त्यामधून निवृत्ती घेतली आहे. संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छतेचा वसा घेत स्वखर्चातून मागील साडेचार वर्षात ३६ जिल्ह्यातील ११२ तालुक्यातील एक हजार गावामधील वाड्या-वस्त्यांवर सायकल, मोटारसायकल वरून त्यांनी प्रवास केला आहे. तेथे ग्रामपंचायत, मंदीर, शाळा, बसस्थानक, शेतात किंवा मिळेल त्या जागेत मुक्काम करत त्यांनी ग्राम स्वच्छता केली. 

    मागील दोन महिन्यापासून मोठ्या शहरातील तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, नगर परिषद यासारख्या ठिकाणी ते साफ सफाई करत ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. ‘ग्रामस्वच्छतेचा मूलमंत्र, आरोग्य आणि समृध्दी एकत्र’,‘आपली स्वच्छता आपल्या हाती, मिळेल आजारातून मुक्ती’ अशा विविध प्रेरक घोषवाक्यांच्या पाट्या तयार करून ते जनजागृती करत आहेत. हरिभाऊंना ग्रामस्वच्छतेबाबत हजारो ग्रामपंचायतीनी प्रशस्तीपत्रक देत सन्मानित केले असल्याचे ते आवर्जून सांगतात. हरिभाऊ उगले हे स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here