UPI Apps Alert : १ जानेवारीपासून ‘या’लोकांचे युपीआय खाती बंद होणार

    190

    नगर : यूपीआय ॲप्स वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीपे (Google pay), पेटीएम (paytm), फोनपे (Phone payआणि भारतपे (Bharat Peसारख्या सर्व यूपीआय पेमेंट ॲप्सना इनॲक्टिव्ह युपीआय खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी गेल्या वर्षभरापासून यूपीआय आयडीचा वापर केला नाही त्यांची यूपीआय खाती बंद करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरनंतर सर्व कंपन्या अशी खाती बंद करण्यास सुरुवात करणार आहे.

    TRAI च्या आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्या ९० दिवसांनंतर दुसऱ्या युजरला डिॲक्टिव्हेटेड सिमकार्ड देऊ शकतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने ९० दिवस नंबर वापरला नाही तर, तो दुसऱ्या व्यक्तीला उपलब्ध होईल. लोकांना नंबरसंदर्भात कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी NPCI ने यूपीआय ॲप्सना गेल्या वर्षभरापासून डिॲक्टिव्हेटेड असलेली सर्व खाती बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या परिपत्रक टीपीएपी आणि पीएसपीमध्ये बँकांना यूपीआय आयडी, संबंधित यूपीआय नंबर आणि एका वर्षापेक्षा जास्त काळ यूपीआय ॲपद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार न केलेल्या ग्राहकांचा फोन नंबर ओळखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एनपीसीआयने अशा ग्राहकांचा यूपीआय आयडी आणि यूपीआय क्रमांक इनवर्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शनपासून रोखण्यास आणि यूपीआय मॅपरमधून त्यांची नोंदणी रद्द करण्यास सांगितले आहे. इनवर्ड क्रेडिट व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या यूपीआय ॲपसह पुन्हा नोंदणी करणे आणि यूपीआय आयडी लिंक करणे आवश्यक आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here