
Akshada Kalash : नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र हंडीनिमगाव (Handinimgaon) त्रिवेणीश्वर येथे अयोध्या (Ayodhya) नगरीतून आलेल्या श्रीराम अक्षदा कलशाचे उत्स्फूर्त स्वागत (Welcome) करण्यात आले. यावेळी “जय श्रीराम”(Jai Shriram) सियावर रामचंद्र भगवान की जय या नामघोषाने हंडीनिमगाव परिसर दुमदुमला होता.
हंडीनिमगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव मंदिर प्रांगणातून श्रीराम अक्षदा कलश मिरवणूकीस महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीराम अक्षदा कलशाचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित सुवासिनींनी पंचारती ओवाळून अक्षदा कलशाचे पूजन करून दर्शन घेतले. ही मिरवणूक हंडीनिमगाव गावात आली असता या मिरवणुकीचे तरुण मंडळासह नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत केले. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिला सुवासिनींनी आपआपल्या दारासमोर सडामार्जन करून रांगोळ्या घालून परिसरात मंगलमय केला होता.
राजराजेश्वरी मुळाई माता देवस्थान येथे मिरवणूक आली असता पंचक्रोशीतील भाविकांनी श्री रमेशानंदगिरी महाराज यांचे पाद्यपूजनाद्वारे संतपूजन केले.अग्रभागी ढोल ताशाचा निनाद करणारे पथक,पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पालखी रथ, पालखी रथामध्ये श्रीराम अक्षदा कलशासह अजानबाहू ब्रम्हलिन प्रल्हादगिरी महाराज यांची प्रतिमा असे या शोभायात्रा मिरवणूकीचे स्वरूप होते. महंत श्री रमेशानंदगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली या शोभायात्रा मिरवणूकीने गावात ग्राम प्रदक्षिणा केली.
या शोभायात्रा मिरवणूकीमध्ये हंडीनिमगावचे सरपंच भिवाजी आघाव,चेअरमन बाळासाहेब साळुंके,माजी सरपंच आण्णासाहेब जावळे,उपसरपंच अशोक कांबळे, सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ, दिगंबर जावळे, साहेबराव भणगे, राजकुमार पाषाण, नवनाथ जाधव, मनोहर जाधव, संतसेवक गोरखभाऊ गुंजाळ, संतोष उंडे, किरण गरड,अरुण पिसाळ यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



