अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागल्यानंतर आता मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमीचा विषय ऐरणीवर आला आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रांगणात असलेली मशीद हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मथुरा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी स्वीकारली आहे.
या याचिकेवर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाशेजारी असलेली याचिका हटवण्याची मागणी या याचिकेमधून केली आहे. आता या याचिकेवर जिल्ह्या न्यायालयात खटला चालणार आहे.
मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत दाखल याचिका न्यायाधीशंनी स्वीकारली आहे. आता श्रीकृष्ण जन्मभूमीशेजारील शाही मशीद हटवण्याच्या मागणीबाबत प्रतिवादी पक्षाला नोटीस जारी होणार आहे. या प्रकरणाची ही सुनावणी १८ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.
*श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणी श्रीकृष्ण विराजमान आणि रंजना अग्निहोत्री यांच्यासह आठ जणांकडून जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी विरोधी पक्षांना नोटीस जारी करण्यात येत आहे.*