Sridevi Prasanna:”श्रीदेवी प्रसन्न”चं मोशन पोस्टर रिलीज;चित्रपट’या’ दिवशी होणार प्रदर्शित

    122

    Sridevi Prasanna नगर : मराठी चित्रपट सृष्टीत एक नवा प्रयोग करत “श्री देवी प्रसन्न” (Sridevi Prasanna) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती या चित्रपटाचे मोशन पोस्टर (Motion Poster) नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

    “श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि स्मार्ट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात आगळीवेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

    सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिकेसह रसिका सुनील, सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके,संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे असे दमदार कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक फॅमिली सिनेमा आहे.

    “श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here