Traffic diverted : ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पुणे-नगर मार्गावरील वाहतुकीत बदल

    111

    Traffic diverted : नगर : हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२३ रोजी जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील (Pune-Nagar Highway) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यापासून ते एक जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक बंद (Traffic stop) राहणार आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना सोडण्यात येणार आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा (Traffic diverted) वापर करावा, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पाेलीस अधीक्षक प्रवीण माेरे यांनी केले.

    असा असेल वाहतूक बदल

    1. शिक्रापूर ते चाकण व चाकण ते शिक्रापूर अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतून बंद राहणार आहे.
    2. पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने खराडी बायपास चौकातून हडपसरमार्गे वळविण्यात येणार.
    3. नगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोडमार्गे पुण्याकडे येतील.
    4. मुंबईकडून नगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे नगरकडे जातील.
    5. मुंबई व ठाणेकडून नगरकडे जाणारी हलकी वाहने ही वडगाव मावळ-तळेगाव-चाकण-खेड-पाबळ शिरुरमार्गे नगरकडे जाते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here