Manoj Jarange : अखेर मराठा आंदोलनाची दिशा ठरली; २० जानेवारीपासून मनाेज जरांगेंचं मुंबईत आमरण उपाेषण

    131

    Manoj Jarange : नगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपाेषण करण्यात येणार आहे, अशी घाेषणा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे (Manoj Jarange) यांनी बीडमधून केली.  

    जरांगे म्हणाले, ” आंदाेलन शांततेत करायचं आहे, मराठा समाजानं ताकदीनं मदतीला येण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर आरक्षण घेऊनच मागे फिरणार आहे.

    छगन भुजबळ हे बुजगावनं आहे. आम्ही गप्प बसलाे की, ताे काड्या करताे. आरक्षण मिळू दे मग त्याला कचका दाखवताे. सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. मी सरकारला मॅनेज हाेत नाही. हा त्यांचा प्राब्लेम आहे. मराठा आरक्षण मिळालं नाही, तर सरकारला जड जाईल. सरकार मराठा समाजाची फसवणूक करतयं. सरकारला वठणी आणण्याची ताकद फक्त मराठ्यात आहे. बीड जिल्ह्यांच्या नादी लागला की, त्याचा विषयच संपला. मराठा समाजाला आरक्षण देणं एवंढच माझे स्वप्न आहे. सरकारने प्रश्न मार्गी लावा, नाटकं कशाला करतायं. जाे आपल्या बाजूनं ताेच आपला नेता. मराठा समाजाला डिवचू नका. आरक्षण हिसकवून आणणार त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मराठा कसे आरक्षण आणतात ते बघाच, असा सज्जड इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here