Murder : सहायक पोलीस निरीक्षकाची हत्या करणारा जेरबंद

    141

    Murder : कर्जत : सहायक पोलीस निरिक्षकांच्या डोक्यात दगड घालून खून (Murder) करून वीस वर्षांपासून जेल तोडून फरार असलेल्या आरोपीस कर्जतचे पोलीस (Police) निरीक्षक घनश्याम बळप आणि त्यांच्या पथकाने दूरगाव (ता.कर्जत) येथे सापळा रचून जेरबंद केले. राजू उर्फ सुदर्शन नारायण पवार (रा. वाळुंज, ता. जि. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (accused) नाव आहे.

    २००५ मध्ये सुरत ग्रामीण परिसरामध्ये आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुजरात पोलीस पथकाला मिळाली होती. यावेळी आरोपी व पोलीस यांच्यात चकमक झाली. यामध्ये पोलिसांचा दारूगोळा संपल्यावर आरोपीने सहायक पोलीस निरिक्षकांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करून तो तिथून पळून गेला होता. त्याच्यावर सुरत परिसरामध्ये १० पेक्षा जास्त दरोडे तसेच सहायक पोलीस निरिक्षक यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुजरात पोलिसांनी पकडल्यावर जेलमध्ये शिक्षा भोगत असताना राजू उर्फ सुदर्शन नारायण पवार हा जेल तोडून फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध गुजरातच्या अथर्व लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी वीस वर्षांपासून गुजरात पोलिसांना गुंगारा देऊन आपली ओळख लपवून वावरत होता.

    याच दरम्यान वरील आरोपी कर्जत तालुक्यातील दुरगाव परिसरामध्ये असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह तत्काळ सापळा रचून शिताफिने आरोपीस पकडले आणि पुढील कारवाईसाठी सुरत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी वाबळे, रवींद्र वाघ, दीपक कोल्हे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, अमित बर्डे, गोरख जाधव, राणी पुरी, अंकुश ढवळे, पोलीस वाहन चालक शकील बेग व पोलीस मित्र महेश जामदार यांनी पार पाडली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here