महिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये?;

महिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये?; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार

सध्या युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केंद्र सरकारच्या एका नव्या योजनेबद्दल माहिती दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओनुसार केंद्र सरकार आता सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत दोन लाख २० हजार रुपये जमा करणार आहे. अशाप्रकारचे मेसेज सोशल नेटवर्किंगवरही व्हायरल केले जात आहे. मात्र तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा, कारण हा मेसेज खोटा आहे. केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर अकाऊंट असणाऱ्या पत्रसूचना विभागानेच (पीआयबी) फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ आणि यामधील माहिती खोटी असल्याचे सांगत ही अफवा असल्याचे शिक्कामोर्तब केलं आहे.

व्हॉट्सअपवर तर हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशभरामध्ये अनेकदा खोट्या बातम्या आणि अफवा सोशल मीडियावरुन व्हायरल होताना दिसतात. मात्र याच अशा व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेक टि्वटर हॅण्डल सुरु करण्यात आलं आहे. ऑनलाइन अफवांपासून लोकांची जागृती करण्याच्या उद्देशाने हे अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. याच फॅक्ट चेकमध्ये केंद्राची अशी कोणतीही योजना नसल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here