Mahendra Singh Dhoni: धोनीची जर्सी होणार निवृत्त; बीसीसीआयचा निर्णय

    142

    Dhoni: नगर : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी (Mahendra Singh Dhoni) ही जगभरात प्रसिद्ध आहे. आता याच जर्सीबाबत (Jersey) बीसीसीआयने (BCCIएक मोठा निर्णय घेतला आहे. धोनीची ओळख असणारी ७ नंबरची जर्सी (Number 7 jersey) यापुढे कोणत्याही खेळाडूला उपलब्ध होणार नाही. धोनीचा ही जर्सी आता निवृत्त होत आहे.

    धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर तब्बल तीन वर्षांनंतर  बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.बीसीसीआयने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की,धोनीची आयकॉनिक ७ क्रमांकाची जर्सी इतर कोणताही  भारतीय क्रिकेटर वापरणार नाही.  

    एमएस धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधांरापैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी-२० वर्ल्डकप, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवला आहे. खेळाडूंची जर्सी निवृत्त करणं हे बीसीसीआयसाठी नवीन नाही. यापूर्वी देखील बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता. सचिन तेंडुलकर १० नंबरची जर्सी मैदानावर उतरायचा. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचे निवडीचे पर्याय मर्यादित झाले आहेत. 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here