{अविनाश देशमुख शेवगांव }9960051755
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 6 डिसेंबर वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजता अंबड पुणे गाडीमध्ये प्रवासासाठी चढत असताना महिलेच्या पर्समधील पाच तोळ्याचे गंठण चोरीला गेल्याचा गुन्हा गु.रजि. नंबर 1128 /2023 शेवगाव पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता 1860 नुसार . भा.दं.वि. कलम 379 नुसार दोन अज्ञात महिला आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पो. ना. सुधाकर दराडे हे करत आहेत शेवगाव शहरातील व्यापारी श्री राजेंद्र डहाळे आणि त्यांच्या पत्नी सौ संगीता राजेंद्र डहाळे हे बसने प्रवास करण्याच्या उद्देशाने बस स्थानकाच्या आवारात प्रतीक्षा करत असताना तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिला फिर्यादीच्या पाठीमागे अंबड पुणे बस मध्ये चढत असताना बसच्या बाहेर गर्दीत लोटालोटी करत असताना शिताफिने पर्स कापून त्यामधून सुमारे सव्वातीन लाख रुपये किमतीचे गंठण अलगद चोरून ते एकमेकांकडे पास करून बस स्थानकातून निघून जाताना सी. सी. टीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे परंतु चेहऱ्याला स्कार्फ बांधल्याने आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले
ताजा कलम
शेवगाव शहराचे बस स्थानकाचे गेली वर्षानुवर्षे बांधकाम सुरू असून प्रवाशांना उभे राहण्यासाठी व बस थांबा नसल्याने कायम गर्दी असते या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांची फावते
विशेष बाब
शेवगाव बस स्थनका मध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी असणे गरजेचे आहे म्हणजे भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत
अविनाश देशमुख शेवगाव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार