{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
शेवगाव तहसील कार्यालय याठिकाणी शेवगाव शहरातील रखडलेली पाणी योजनेसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आक्रमक
आज मा.आमदार चंद्रशेखर घुले शेवगाव तहसील कार्यालय याठिकाणी शेवगाव शहरातील रखडलेली पाणी योजनेसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
शेवगाव नगरपरिषदेचे पाणी योजनेसाठी वर्क आर्डर देवुन देखील साहा महिने होऊन देखील संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने मुख्याधिकारी शेवगाव शहरातील एक लाख लोकांच्या जिवाची अवहेलना केली जात आहे तरी आपण सदरील रखडलेले योजनेचे काम करुन लवकरात लवकर चालु करावे तसेच ५ तारखेला जिल्हा धिकारी कार्यालय याठिकाणी होणारी बैठकीत या योजनेत ज्यांनी दिरंगाई केली असेल त्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी,तसेच चालु योजनेची व्यवस्थित नियोजन करून शहरातील नागरिकांना तीन दिवसाला पाणी उपलब्ध करून देण्याचे सोय करावी ही मागणी निवेदन देत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवगाव शहर यांच्यावतीने मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल हा इशारा देण्यात आला
याप्रसंगी संजय फडके, ताहेर पटेल, कैलास तिजोरे, कमलेश लांडगे, क्रुष्णा ढोरकुले, अजिंक्य लांडे,उमर शेख,मनोज तिवारी, जाकिर कुरेशी, नंदु मुंडे,भाऊसाहेब कोल्हे,सुनिल काते,राहुल सावंत,जमीर पटेल, संतोष जाधव, अविनाश सारडा,समीर शेख,सोमनाथ मोहिते, अब्दुल बारी, योगेश बोडखे, शाहनवाज शेख,इम्राण मनियार,वाहाब शेख,अशपाक पठाण, गोविंद किंडमिंचे,महेश गवते ,सुरज काशिद यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते
ताजा कलम
शेवगाव शहरात भर हिवाळ्यात पाण्याची दुर्भिक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जयजय स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शेवगावच्या पाणी प्रश्नावर रान माजवले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही त्यात उडी घेतली आहे आता योजना वेग घेते किरण रखडसे हे काळच ठरवेल
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार





