Pillu Bachelor : ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

    113

    नगर : मराठी मनोरंजनसृष्टीत विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. असाच एक नवा प्रयोग करत ‘पिल्लू बॅचलर’ (Pillu Bachelorहा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच (Trailer Out) झाला आहे. येत्या १५ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक तानाजी घाटगे (Director Tanaji Ghatge) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

    तानाजी घाटगे यांनी बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट यापूर्वी मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटात देखील वेगळी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि विनोदाची फोडणी पाहायला मिळणार आहे.’पिल्लू बॅचलर’ या सिनेमात पार्थ भालेराव, अक्षया देवधर, सायली संजीव, शिवाली परब, डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले हे कलाकार बघायला मिळणार आहेत.  

    वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी ‘पिल्लू बॅचलर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. ‘पिल्लू बॅचलर’ या सिनेमात प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका असल्याचे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळालंआहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना १५ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here