Unseasonal rain : ‘अवकाळी’चा नगर जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांना फटका

    143

    Unseasonal rain : नगर : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) नगर जिल्ह्यातील शेती पीक व फळबागांचे माेठे नुकसान (Damage to orchards) झाले. जिल्ह्यातील २५८ गावांतील केळी, कांदा, पेरू, मका, द्राक्षे, ज्वारी, टोमॅटो, डाळिंब पिकांची हानी झाली. आतापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ३४३ शेतकऱ्यांना फटका बसला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने (District Administration) दिली.

    दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पारनेर, अकोले, संगमनेर आणि राहाता तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना दिल्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पारनेर तालुक्यातील अवकाळीग्रस्त गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली. जिल्ह्यात १०७ गावात पावसामुळे ८५७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यात आणखीन ६१ गावांची भर पडून गावांची संख्या १६८ वर पोहोचली. एकूण १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते.

    अवकाळी पावसाने दिवसेंदिवस नुकसानग्रस्तांचा आकडा वाढत आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यातून श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव आणि कोपरगाव तालुका वाचले असल्याचे कृषी विभागाच्या नुकसानीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यात नगर तालुक्यात ९, पारनेर ४९, पाथर्डी १, श्रीगोंदा ४२, जामखेड ४०, श्रीरामपूर २७, नेवासे ४, संगमनेर १३, अकोले ६०, राहाता ७ या गावात अकाळीचा फटका बसला आहे. कोपरगाव तालुक्यातील ६ गावात अवकाळीमुळे नुकसान झाले असले तरी ते ३३ टक्क्यांच्या आत आहे. कर्जत तालुक्यातील माहिती मिळणे बाकी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

    आता जिल्ह्यातील २५८ गावे, २७ हजार १०४ शेतकऱ्यांचे २१ हजार ५८१ हेक्टरवर ३३ टक्क्यांच्या आत तर ३६ हजार ३४३ शेतकऱ्यांचे २२ हजार ८०६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. यात केळी, कांदा, पेरू, मका, द्राक्ष, ज्वारी, टोमॅटो, डाळिंब, बोर, पपई, सिताफळ, कांदा, कापूस, लिंबू, भाजीपाला, सोयाबीन, मका, तूर, बाजरी, भात या पिकांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या नुकसानीच्या माहितीत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here