Anti Corruption Bureau : नगर जिल्हा परिषदेचा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

    140

    Anti Corruption Bureau : नगर : नगर जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) बांधकाम विभागात कार्यरत असलेला लिपिक संतोष बाळासाहेब जाधव (वय ३९) याला २२ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.(Caught red-handed)

    जांभळी गावातील सभामंडपासाठी  १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला कार्यारंभ आदेश देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजपर्यंत कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. कार्यारंभ आदेश देण्यासाठी लिपिक जाधव याने दीड टक्के प्रमाणे २३ हजार रुपयांची मागणी केली होती.

    तडजोडी अंती जाधव याने २२ हजार ५०० रुपये तक्रारदारच्या पतीकडून घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार आज दुपारी जाधव याने लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here