नीट परीक्षेचा रिझल्ट आज, कसा आणि कुठे पाहाल निकाल
⚡ राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल आज 16 ऑक्टोबरला घोषित होणार आहे.
?️ यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्वीट करत माहिती दिली होती.
⏳ लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडली होती.
??? देशभरातील जवळपास 15 लाख विद्यार्थी ‘नीट’ मेडिकल प्रवेश परीक्षेला बसले होते.
?♂️ NEET Result 2020: रिझल्ट असा चेक करा
● सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
● यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
● त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
● नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
● आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.