किरीट सोमय्यांना अटक! आंदोलनादरम्यान केली कारवाई!

भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना अटक करत घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये नेलं.

घाटकोपरमधील शितल दामा या महिलेचा गटारात पडून मृत्यू झाला होता. या मुद्द्यावरून किरीट सोमय्या घाकोपरमध्ये आंदोलन करत होते. या आंदोलनांदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना आंदोलन थांबवण्यास सांगितलं. मात्र सोमय्या आणि मुंबई पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना अटक करत घटकोपर पोलीस ठाण्यात नेलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आंदोलन करण्यापूर्वी सोशल मीडिया वरून आंदोलनाची पूर्व माहिती दिली होती. दुपारी 12 वाजता घाटकोपर मधील चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर महिलेच्या कुटुंबासोबत आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

यासंबंधीत त्यांनी एक ट्विट केलं होतं. शितल दामाचा परिवाराला न्याय हवा. आज दुपारी १२ वाजता घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिस स्टेशनच्या बाहेर शीतलच्या परिवारासोबत मी ठिय्या आंदोलन करणार आहे.

पोलीसांनी १२ दिवसानंतरही एफआयआर रजिस्टर केला नाही, असं ट्विट सोमय्या यांनी केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here