Sarla bet : सरला बेटावरील रस्त्याचा मार्ग मोकळा; रामगिरी महाराजांकडून समाधान व्यक्त

    140

    श्रीरामपूर : श्री क्षेत्र सरला बेटावर (Sarla bet) श्रीरामपूर मार्गे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या रस्त्याची मोठी अडचण होती. आमदार लहु कानडे (MLA Lahu Kanade) यांनी या रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. याबरोबरच त्यांनी तालुक्यतील विविध रस्त्यांची कामे केली आहेत. कामे होत राहतात. परंतु प्रशासकीय कामाचा अनुभव, विकास कामांची इच्छा व व्हिजन असलेला आमदार तालुक्याला मिळाला, हे आपले भाग्य असल्याचे गौरोद्गार श्री क्षेत्र सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी काढले.

    तालुक्यातील माळेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, नानासाहेब रेवाळे, प्रविण काळे, सचिन जगताप, सरपंच शंकर विटनोर, उपसरपंच बाबासाहेब औताडे, भागचंद औताडे, सोपान त्रिंबक औताडे, राजेंद्र औताडे, मदन हाडके, रमेश आव्हाड उपस्थित होते.

    महंत रामगिरी महाराज म्हणाले, या भागातील रस्त्यांची खूपच दयनीय अवस्था होती. बेटावर येण्यासाठी भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. आ. कानडे यांनी या भागातील श्रीरामपूर-नाऊर, पुणतांबा यासह अनेक रस्त्यांची कामे केली. श्रीरामपूरपासून माळेवाडी पर्यंतचा रस्ता झाला. आता पुढील काम होणार आहे. यामुळे बेटावर येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय दूर होईल. ज्यांनी गंगागिरी महाराज यांची सेवा केली त्यांची निश्चित उन्नती होते, चांगल्या क्वाँलीटीचा रस्ता होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    आ. कानडे म्हणाले, मतदार संघात दळणवळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या श्रीरामपूर- बेलापूर, बाभळेश्वर ते नेवासा या रस्त्याचे चौपदरीकरण केले. श्रीरामपूर-वैजापूर, पुणतांबा यासह शहराला जोडणाऱ्या चोहोबाजूने चारपदरी रस्ते झाले. केवळ रस्ते केले नाही तर ते दर्जेदार, उत्तम व टिकाऊ कसे होतील याकडे लक्ष दिले. श्रीरामपूर-सराला हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. त्याला राज्य सरकारचा निधी नसतो. मात्र आपण महाराजांना शब्द दिला होता. आपले सरकार व तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे हट्ट धरून यासाठी निधी मंजूर केला. आतापर्यंत दोन टप्पे झाले. आता तिसरा टप्पा होत आहे. पुढील काळात संपूर्ण रस्ता होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

    तालुक्याचे राजकारण एव्हढे सोपे नाही. ज्याला भीती वाटते त्याने राजकारणात येऊ नये. त्याची तयारी ठेवूनच आले पाहिजे. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला जनतेने आशिर्वाद दिले. जनतेचे आशिर्वाद कामाच्या पाठीशी असतात. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आपल्यासमोर आहे. मी कधी लक्ष घालत नव्हतो, मात्र लक्ष घालायची वेळ आली. मोठ्या प्रमाणावर लोक या विकास कामांना दाद देत असल्याचे आ. कानडे म्हणाले.

    यावेळी गणपत दादा औताडे, शाहूराज वमने, शैलेश वामने, पोपटराव भसाळे, बबन औताडे, बाळासाहेब औताडे, संजय भनगडे, रामभाऊ औताडे, अँड. अण्णासाहेब मोहन, इसाकभाई, रफिकभाई सय्यद, भाऊसाहेब औताडे, बापूसाहेब औताडे, सुरेश तात्या औताडे, दत्तात्रय औताडे, विठ्ठल भसाळे, संपतराव औताडे, शंकरराव गागरे, संतोष निघूट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here