खंडग्रासचंद्रग्रहणजे कोण ग्रहण पाळणार असतील तर, त्यांच्या साठी ही माहिती.

    161

    शनिवारी दि २८/१०/२३ रोजी उत्तर रात्री 01:00 ते 2:30 चंद्रग्रहण आहे. दु ०३:१४ पासून वेध सुरू होतात पण बाल,वृद्ध,अशक्त, आजारी, गरोदर स्त्रिया सर्वांनी शनिवारी सायं०७:४१पासून वेध पाळावेत. म्हणजेच सायं ०७:४१ पर्यंत भोजन करावे. सायं ०७:४१ नन्तर जप, वाचन, नामस्मरण, दानधर्म, अवश्य करावे. – मुख्य ग्रहण काळ रात्री ०१ ते ०२:२३ आहे- या काळात काहीही खाऊ नये, पाणी वगैरे पिऊ नये, झोपू नये, मलमूत्र विसर्जन करू नये. – रात्री ०२:२३ नंतर स्नान करून मगच खावे. -मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना शुभ फळ.सिंह, तुळ, धनु, मीन या राशीना मिश्र फळ.मेष, वृषभ, कन्या, मकर या राशीना अनिष्ट फळदु १२ पर्यंत सर्व खाद्यपदार्थ व पाण्यात तुळस ठेवावी, म्हणजे ग्रहण काळांनंतर ते वापरण्यास हरकत नाही.

    – चंद्रग्रहण व कोजागिरी- शनिवारी दि२८/१०/२३ रोजी कोजागिरी पौर्णिमा असलेने नियमितपणे रात्री १२ वा. इंद्राचे व श्री लक्ष्मी विष्णु चे पूजन करता येईल दुधाचा नेवैद्य दाखवता येईल पण प्रसाद म्हणून एक पळीभर दूध प्राशन करता येईल, राहिलेले दूध दुसऱ्यादिवशी सकाळी प्यावे.ग्रहण दिसणारे प्रदेशसंपूर्ण भारतासह आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप, आफ्रिका खंड

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here