शेवगाव शहराचे स्ट्रीट लाईट दिवसा चालू आणि रात्री बंद नगरपरिषद शेवगाव आणि महावितरण चा अजब कारभार

    146

    याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसापासून शेवगा शहरातील अनेक भागांमध्ये नगरपरिषद चे पथदिवे { स्ट्रीट लाईट } आणि जागोजागी बसविलेले हाय मॅक्स रात्रंदिवस सुरू असतात महावितरण कार्यालयाची विज यांना फुकट आहे का ??? असा सवाल सर्वसामान्य शेवगावकरांना पडला आहे नेवासा रोड प्रभाग क्रमांक 13 मुख्य बाजारपेठ आणि शहरातील अनेक जुन्या गल्ल्यां मध्ये शहराच्या विविध भागांमध्ये रात्रीचे स्ट्रीट लाईट बंद असतात आणि शहरातील अनेक भागांमध्ये दिवसा सुद्धा चालू असतात नेमके काय गौडबंगाल आहे ” पूर्वी सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बारा तास हे स्ट्रीट लाईट सुरू असत परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे रात्रंदिवस सुरू असतात याची तक्रार नेमकी कोणाकडे करायची हा एक प्रश्न आहे याला जबाबदार महावितरण कार्यालय की नगरपरिषद शेवगाव.

    ताजा कलम

    शेवगाव शहरांमध्ये चार महिन्यापूर्वी दंगल झाल्यानंतर तातडीने प्रत्येक प्रमुख चौकामध्ये गाडगे बाबा चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक छत्रपती संभाजी महाराज चौक नेवासा रोड छ. शिवाजी महाराज चौक अशा अनेक भागांमध्ये भले मोठ्या हायमॅक्सचे खांब उभारून ठेवले आहेत त्याला वायरिंगही केली आहे परंतु नगरपरिषद त्याला 220 वॉट चे दिवे बसवायला नाहीत म्हणून काम अर्धवट आहे ते पूर्ण करायला वरून ब्रह्मदेव येणार आहे का ??? लाखो रुपये खर्च करून हे खांब नेमकी कोणासाठी उभे केले आहेत !!! त्यातील दोन तीन खांब शेवगावच्या बसस्थानकामध्ये लोळत पडले आहेत त्याचे बरेचसे सामान गायब झाले आहे याला जबाबदार कोण???

    विशेष बाब

    2017-18 मध्ये शेवगाव मध्ये सुमारे 48 लाख रुपयांची स्ट्रीट लाईट बसवण्या मध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला होता त्यात अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची चर्चा आहे तसा तर काही प्रकार सुरू नाही ना अशीही चर्चा आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here