
रात्रभर फोन चार्जिंगला लावताय तर हे नक्की वाचा!
आजकाल नवनवीन तंत्रज्ञानामुळे टेक्नोलॉजी बदलत चालली आहे. त्यामध्ये मोबाईलचे जनरेशन वेगाने बदलत चालले आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी मोबाईल फोन चार्ज होण्यासाठी तब्बल 4 ते 5 तास लागत होते. मात्र आता आजकालचे फोन चार्जिंग होण्यासाठी अवघे दोन ते अडीच तास लागत आहेत. त्यामुळे आजकालचे फोन स्मार्टफोन झाले आहेत. जे स्मार्टफोन 2 तासात चार्ज होतात तेच फोन आपण रात्री झोपताना चार्जिंगला लावतो.मात्र त्यावेळी त्या फोनला 7 ते 8 तास वीज मिळते. ती गोष्ट फोनच्या बॅटरी हेल्थसाठी फार धोकादायक आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्यास फोनच्या बॅटरीची हेल्थ खराब होते आणि फोनची बॅटरी लवकर बिघडते. त्यामुळे जर तुम्ही रात्रभर फोन चार्जिंगला लावत असाल तर ते आत्ताच थांबवा.
तुम्ही फोन चार्जिंगला लावून झोपत असाल तर ते वेळीच थांबवा!
स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर फोनची क्षमता कंपनीने नमूद केल्याप्रमाणे तेवढा वेळ चालते. मात्र आपण स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपतो. यामुळे फोनची बॅटरी लवकर उतरते. तसेच ही गोष्ट वारंवार होत असेल तर ही समस्या फोन जास्त वेळ चार्ज केल्यामुळे उद्भवते. आत्ताचे स्मार्टफोन हे लिथियम-आयन बॅटरीसह येतात त्यामुळे स्मार्टफोनला पॉवर मिळते. परंतु अति जास्त प्रमाणात चार्जिंगचा परिणाम मोबाईल बॅटरीच्या आरोग्यावर होतो.यासह अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होते यासह जर तुम्हीही रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपत असाल तर चार्जर देखील गरम होते. यामुळे तुमच्या स्मार्टफोनला धोका निर्माण होऊ शकतो.
मोबाईल ओव्हर चार्ज कारण टाळा!
जर तुम्ही मोबाईल रात्रभर चार्ज करत असाल तर ते वेळीच थांबवा. रात्रभर स्मार्टफोन चार्ज केल्यास मोबाईल आवश्यकतेपेक्षा 4 पट अधिक जास्त चार्ज होतो. मात्र अति जास्त स्मार्टफोन चार्ज केल्याने त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. उन्हाळयात अनेक ठिकाणी चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा धोका टाळण्यासाठी मोबाईल चार्जिंगला लावताना आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी. त्यामुळे जर तुम्हाला
स्मार्टफोन चार्जिंगचा बॅकअप वाढवायचा असेल तर तुम्ही 20 ते 80% च्या दरम्यान फोन चार्ज करा. त्यामुळे चार्जिंग जास्त वेळ टिकते. आणि बॅटरी देखील लवकर खराब होत नाही.फोन 100 टक्के चार्ज झाल्यावर काय होत?बदलत्या टेक्नोलॉजीमुळे मोबाईल स्मार्ट झाला आहे. जर तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावून झोपल्याने फोन 100 टक्के चार्जिंग होतो. अशावेळी कंपनीने स्मार्टफोनमध्ये असे चार्जिंग सर्किट केले आहे जे बॅटरी १०० टक्के चार्ज झाल्यानंतर आपोआप पुरवठा थांबवते.
यापूर्वी मोबाईल पूर्णपणे चार्ज झाल्यावर बॅटरी फुगण्याच्या गोष्टी जास्त प्रमाणात घडत असत. यामुळे मोबईल लवकर खराब होत असे. ही बाब कंपनीने लक्षात घेऊन आत्ताच्या स्मार्टफोनमध्ये सापडलेला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला आहे. हा प्रोसेसर इतका स्मार्ट आहे की मोबाईलची बॅटरी पूर्ण झाल्यावर आओपाप चार्जिंग होणे थांबते आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे बॅटरीची चार्जिंग 90 टक्के पर्यंत पोहोचताच ती पुन्हा चार्ज होऊ लागते.स्मार्टफोन चार्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी 20 टक्क्यांवर आली असेल तर अति जास्त फोनचा वापर करू नका. तसेच फोनची चार्जिंग 20 टक्क्यांवर आल्यावर सोशल मीडियावर वेळघालवू नका.तज्ज्ञांच्या मते स्मार्टफोनची चार्जिंग पूर्णपणे संपवू नकायामुळे तुमचा फोन पूर्णतः बंद होऊ शकतो.
मोबाईल पुन्हा चालू होण्यास समस्या येऊ शकतात.कोणताही स्मार्टफोन चार्ज करताना 80 टक्क्यांपर्यंतच करा. जेणेकरून बॅटरीचा बॅकअप जास्त वेळ टिकतो.सर्वात महत्वाचं म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर फोन चार्जरपासून वेगळा करा. जेणेकरून बॅटरीचे आयुष्य जास्त दिवस टिकते.जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी 75 टक्क्यांपर्यंतच करत असाल तर तुम्ही चार्जेर बंद करा. यामुळे फोनची बॅटरी जास्त काळ चांगली राहण्यास मदत होते.स्मार्टफोन गरम होतोय?तुमही स्मार्टफोन गरम होत असेल तर तुमच्यासाठी हे महत्वाचे आहे. स्मार्टफोन चार्जिंग करत असताना तेथील वातावरणाचे तापमान हे 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नसावे. तसेच स्मार्टफोन चार्जिंगला लावलेल्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश किंवा तीव्र सूर्य किरणं पडू देऊ नका. तसेच चार्जिंग सुरु असताना मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा.




