मित्रांनो, हा नेता कोण या नेत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून कशी बेताल वक्तव्ये केली आहेत, ही तुम्ही सर्वजण जाणता आहातच. त्यामुळे तो नेता कोण, या खोलात जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्राध्यापक नामदेव जाधव यांनी त्या नेत्याच्या सात हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेण्याचं धाडस दाखवलं आहे, ते प्रचंड कौतुकास्पद आहे. प्राध्यापक जाधव यांनी यासाठी तीन महिन्यांची मुदत मागण्याचं कारण असं, की या मंत्राकडे किंवा या नेत्याकडे खरोखरच ७ हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे, की साडेसहा हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे, याची तपासणी किंवा याची खातरजमा करण्यासाठी हा वेळ आवश्यक असल्याने एक सहकार्याची भावना म्हणून त्या नेत्याने आम्हाला तीन महिन्यांची यासाठी मुदत द्यावी, असा आग्रह प्राध्यापक नामदेव जाधव यांनी त्या नेत्याकडे धरला आहे. या संदर्भात प्राध्यापक नामदेव जाधव यांचा फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या व्हिडिओची प्रचंड चर्चा राज्यात सध्या सुरू आहे.
विशेष म्हणजे सात हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या या खरेदी- विक्री व्यवहारात पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘एम ओ यु’ करण्याची प्राध्यापक नामदेव जाधव यांची तयारीदेखील आहे. या प्रॉपर्टीचा ‘आयपीओ’ काढणार असल्याचे प्राध्यापक जाधव यांनी सांगितलं असून त्या प्रॉपर्टीतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज स्कील युनिव्हर्सिटी’ काढणार आहेत. या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर मोफत, निःशुल्क शिक्षण द्यायला प्राध्यापक जाधव यांची तयारी आहे.
प्राध्यापक नामदेवराव जाधव म्हणताहेत, ‘खरं तर मी एका श्रीमंत माणसाच्या किंवा कुबेराच्या शोधात होतो. माझ्या सुदैवानं तो मला मिळाला असून या नेत्याच्या 7000 कोटींच्या प्रॉपर्टीची खातरजमा करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात यावा. कारण ही प्रॉपर्टी या नेत्याच्या कोणकोणत्या मुलांच्या, जावयाच्या, नातवांच्या तसेच आणखी कोणकोणत्या नातेवाईकांच्या नावावर आहे, एका अर्थानं ही प्रॉपर्टी या नेत्याकडून कुठपर्यंत झिरपत गेली आहे, त्याचा तपास करण्यासाठी आम्हाला तीन महिन्यांची आम्हाला मुदत द्यावी, अशी उपरोधिक मागणी प्रा. नामदेवराव जाधव यांनी केली आहे.




