Netherlands vs Sri Lanka : अखेर श्रीलंकेच्या पारड्यात विजय; नेदरलँडचा केला पराभव

    150

    नगर : यंदाच्या विश्वचषक (World Cup) एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत श्रीलंकेला पहिला विजय अखेर मिळाला. श्रीलंका संघाने नेदरलँडचा (Netherlands vs Sri Lanka) पाच गडी व १० चेंडू राखून पराभव केला. सदिरा समरविक्रमाने १०७ चेंडूंत नाबाद ९१ धावा केल्या. तो सामनावीर ठरला.

    या सामन्यापूर्वी श्रीलंका संघाने यंदाच्या विश्वचषकात एकही सामना जिंकला नव्हता. तर नेदरलँडने एक विजय मिळविलेला होता. त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरविले होते. नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने नेदरलँडचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद केले. मात्र, तळाचे फलंदाज सायब्रँड इंगलब्रेचेटने ७० धावा तर लोगन बीकने ५९ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक स्थितीत आणले. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका व कसून रजिता या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी चार फलंदाज बाद केले. नेदरलँड संघाने ४९.४ षटकांत सर्वगडी गमावत २६२ धावा जमविल्या.

    श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. दोन फलंदाज झटपट बाद झाल्यावर पथुम निसंका सिल्व्हा (५४ धावा) व समरविक्रमाने डाव सावरला. निसंका बाद झाल्यावर समरविक्रमाने जबाबदारीने खेळत संघाला विजय मिळवून दिला. नेदरलँड संघाकडून वेगवान गोलंदाज आर्यन दत्तने सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले. श्रीलंका संघाने ४८.२ षटकांत पाच गडी गमावत २६३ धावा करत विजय मिळविला.

    या विजयामुळे श्रीलंकेने यंदाच्या विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले आहे. अंकतालिकेत श्रीलंका नवव्या स्थानी तर नेदरलँड आठव्या स्थानी आहे. न्युझीलँड प्रथम तर भारत द्वितीय स्थानी आहे. या दोन्ही संघांत उद्या (रविवारी) धर्मशाला येथे दुपारी सामना होईल. मागील विश्वचषकात नेदरलँड संघाने भारताचा उपांत्यफेरीत पराभव केला होता. हा पराभव भारतीय संघाच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा बदला भारतीय संघ घेणार का? हे उद्याच्या सामन्यात ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तानला भारताने पराभूत केले आहे. त्यामुळे संघाचे मनोबल वाढलेले आहे. त्यामुळे न्युझीलँड विरोधात विजय मिळविण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here